पंतप्रधानांनी लॉन्च केल्या तीन सामाजिक सुरक्षा योजनां

0
10

वृत्तसंस्था
कोलकाता,दि. ९-निवडणुकीपूर्वी देशवासीयांना दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्तता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणार्‍या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचे लोकार्पण केलेे. यातील दोन योजना नागरिकांना विमा सुरक्षा देणार्‍या आणि अन्य एक योजना पेन्शन देणारी आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
देशातील सर्वच राज्यांमध्ये एकाचवेळी या तीनही योजनांचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथे या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात विकास प्रकल्पांचा प्रारंभ केल्यानंतर ते थेट कोलकात्याला आले आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येत त्यांनी या महत्त्वाकांक्षी योजना समर्पित केल्या. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पश्‍चिम बंगालला दिलेली ही पहिलीच भेट आहे.
या योजने अंतर्गत एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपये इतक्या रकमेच्या मासिक पेंशनचे पर्याय देण्यात आले आहेत. यासाठी वेगळा प्रीमियम द्यावा लागणार आहे. वयाच्या 40 वर्षांपर्यत तुम्ही या योजनेचे सदस्य होऊ शकता. वयाच्या 60 व्या वर्षीपासून तुम्हाला पेंशन मिळण्यास सुरूवात होईल.
ही योजना १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींसाठी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत केवळ ३३० रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींना दोन लाख रुपयांचा जीवन विमा उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रीमियम भरणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विम्याची रक्कम मिळू शकणार आहे.