26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आमगाव तालुक्यात ड्रम सिडरच्या साहाय्याने भात पेरणीचा नवा प्रयोग

आमगाव तालुक्यात ड्रम सिडरच्या साहाय्याने भात पेरणीचा नवा प्रयोग

0
1163

आमगाव:- तालुक्यातील भोसा येथील शेतकरी रामेश्वर मेंढे व चिंतामण कारंजेकर यांच्या शेतावर ड्रम सिडर या यंत्राचा वापर करून भात पेरणीचा प्रयोग करण्यात आला. कृषी विभागाच्या सहकार्यने तालुक्यात प्रथमच या यंत्राचा वापर करून भात पेरणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ड्रम सिडरच्या सहाय्याने कमी वेळात धान पिकाची पेरणी करणे शक्य होईल असे मत कृषी पर्यवेक्षक घनश्याम चौधरी यांनी व्यक्त केले . एका ड्रम च्या साहाय्याने दोन ओळी अशा प्रकारे चार ड्रम च्या सहाय्याने आठ ओळीत २० सेंमी अंतर ठेवून पेरणी करता येते. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त पेरणी होते व बियाणांची बचत होते व एक मजूर या यंत्राद्वारे एका दिवसात २ ते ३ एकर धान पेरणी करता येते. धान लावणीच्या वेळी मजुरी खर्चात बचत होते.अशी माहिती कृषी पर्यवेक्षक घनश्याम चौधरी यांनी दिली.
यावेळी प्रात्यक्षिक कार्यक्रमात जि प सदस्य सुरेश हर्षे, सरपंच सुनील ब्राम्हणकर, उपसरपंच लोकचंद तरोने कृषी मित्र टीकाराम भांडारकर,तालुका कृषी अधिक्षक सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंडे, कृषी सहायक ए एम एनगंटवार,नितीन मुंडे, बोदा चे पोलीस भांडारकर व गावातील शेतकरी उपस्थित होते.