व्यापमची सीबीआय चौकशी करा – शिवराज

0
10

नवी दिल्ली दि.७– मध्यप्रदेश उच्च न्यायालयाला पत्र लिहून आपण व्यापम घोटाळयाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात हा विषय सुनावणीला आला तर तिथेही आम्ही सीबीआय चौकशीची विनंती करु असे चौहान यांनी सांगितले.
लोकशाहीमध्ये सत्ताधा-यांवर संशयाची सुई नसावी. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे. लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर मिळाले पाहिजे असे शिवराज म्हणाले.
लोकांची इच्छा महत्वाची आहे. सीबीआयला व्यापम घोटाळयाच्या चौकशीची परवानगी मिळावी यासाठी मी उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. सीबीआय चौकशीच्या निर्णयासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.