‘भाभा’ रिसर्च सेंटरभोवती घिरट्या घालताना आढळला ड्रोन

0
14

वृत्तसंस्था,
मुंबई,दि. ७ -सुरक्षेच्या दृष्टिने अतिसंवेदनशील असणार्‍या भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरच्या परिसराच्या वरच्या भागात एक ड्रोन आढळून आला. हा संशयास्पद ड्रोन जवळपास २५ मिनिटांपर्यंत आकाशात घिरट्या घालत होता. त्यानंतर मात्र हा ड्रोन त्या परिसरातून गायब झाला. परिसराची ड्रोन कॅमेर्‍याने टेहाळणी होत असल्याचा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी एका अपरिचित व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर भारताचा पहिला न्यूक्लियर रिसर्च सेंटर आहे.
भाभा अणुकेंद्र पूर्वीपासूनच दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. त्यामुळे येथे कडक सुरक्षा आहे. दरम्यान आज मंगळवारी या परिसरात ड्रोण कॅमेरा आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी या ड्रोनची उंची २० मीटरपर्यंत होती, असे सांगितले जात आहे.
काल दुपारी दीडच्या सुमारास देवनार डेपो समोर असणार्‍या टाटा इन्सिट्युट ऑफ सोशल सेंटर गेट समोर एका टुरिस्ट कारमधून आलेल्या तीन जणांनी दोन ड्रोन कॅमेर्‍यानं शुटींग केलंय. ड्रोन कॅमेर्‍यानं शुटींग करण्यात आल्याची तक्रार ट्राम्बे पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्राध्यापक व्यंकट नागेश बाबू यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.