अॅलोपॅथी पद्धतीने उपचारास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

0
10

नवी दिल्ली दि.१0: -: या पुढे अॅलोपॅथी उपचार पद्धतीने आयुर्वेदिक डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून आयुर्वेद डॉक्टरांचा गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परवानगीशिवाय आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅालोपॅथीचे उपचार करता येणार नाही, असा आक्षेप याचिकेमध्ये नोंदविण्यात आला होता. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत प्रॅक्टीस करण्यास परवानगी दिली आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅ लोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रातील ९५ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रातील आयुर्वेद डॉक्टरांना अॅ५लोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास कायद्याने संरक्षण गतवर्षीच मिळाले आहे.अॅ लोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास महाराष्ट्र सरकारने आयुर्वेद डॉक्टरांना परवानगी दिल्यानंतरही इंडियन मेडिकल असोसिएशनने आपला विरोध कायम ठेवला होता. हा संघर्ष हायकोर्टानंतर थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. आयएमएच्या याचिकेवर निमाने कॅव्हेट दाखल केले होते.

आयुर्वेद डॉक्टरांना अॅएलोपॅथीची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण विषय मांडल्यानंतर त्यास दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळाले. त्यानंतर शासनाने परिपत्रक काढून बीएएमएस, बीयूएमएसच्या डॉक्टरांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट असलेल्या अॅंलोपॅथीच्यानुसार औषधे वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र आयएमएने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने आयएमएची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आयएमएने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत आयुर्वेद डॉक्टरांना अॅरलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.