तृतीयपंथीयांसाठी भोपाळमध्ये पहिले अभ्यासकेंद्र!

0
11

भोपाळ,दि.१0: — इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिले अभ्यासकेंद्र उघडले जाणार असून अशा प्रकारचे हे देशातील पहिले अभ्यासकेंद्र असेल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने समाजातील उपेक्षित घटकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल उचलले असून या अभ्यासकेंद्राची स्थापना तृतीयपंथीय बहुल भागात केली जाणार आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयांना एकत्र येऊन सामूहिकरित्या शिक्षण घेता न आल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन भोपाळमध्ये हे अभ्यासकेंद्र उघडले जाणार आहे. अनेक जणांना मध्येच शिक्षण सोडून द्यावे लागते त्यामुळे ते पुन्हा शिक्षण सुरू करू शकतात. यातून त्यांना रोजगाराच्या विविध संधीही उपलब्ध होतील. देशातील पहिली तृतीयपंथीय आमदार शबनम मौसी या भोपाळमधीलच आहे या देखील एक योगा-योग आहे. कोलकात्यामध्ये एका महिला महाविद्यालयाची प्राचार्या मानवी बंडोपाध्याय या पहिल्या ट्रांसजेंडर प्राचार्या बनल्या आहेत त्यानंतर या समुदायामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच इग्नूने हे पाऊल उचलायचे ठरवले आहे. या समुदायातील लोकांना १८-२० जुलै रोजी चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल असे भोपाळ रिजनल सेंटरचे डायरेक्टर यु. सी. पांडे यांनी म्हटले आहे.