युपीएससीच्या परीक्षेत स्वप्नील चौधरीचे सुयश

0
7

स्वप्नील चौधरीचा अभियंता संघटनेतर्फे सत्कार

गोंदिया, दि. १० : येथील जिल्हा परिषद गोंदियाचे लघु पाटबंधारे उपविभागात कार्यरत सहायक अभियंता यादोराव चौधरी यांचा मुलगा स्वप्नील चौधरी याची भारतीय प्रशासकीय सेवेकरिता निवड झालेली आहे. संपूर्ण देशातून सुमारे चार लाख ५२ हजार परिक्षार्थी यु.पी.एस.सी. च्या परिक्षेकरिता सहभागी झाले होते. यापैकी १२०० परिक्षार्थींची निवड झालेली असून त्यात स्वप्नील चौधरी याने ६८३ वा स्थान प्राप्त केले. गोंदिया जिल्ह्यास हे बहुमान वर्ष २०११ नंतर प्रथमच प्राप्त झाले आहे.यापुर्वी शिक्षक असलेले पारधी दामप्ताचे सुपुत्र सौरभ पारधी याने 2011 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.सौरभ पारधी आज गुजरात सरकारमध्ये आयएएस अधिकारी आहे.स्वप्नीलच्या यशाबद्दल त्याचा सत्कार जिल्हा परिषद अभियंता संघटनेतङ्र्के करण्यात आला.
विदर्भातून एकूण ङ्कक्त सात परिक्षार्थी या परिक्षेत यशस्वी झाले असून त्यातही स्वप्नीलने प्राविण्य यादीत दुसèया क्रमांकावर आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेतङ्र्के त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष वासुदेव रामटेककर, माजी अध्यक्ष विकास देशपांडे, उपाध्यक्ष गोवर्धन बिसेन, कोषाध्यक्ष देवेंद्र निमकर, अभियंता दिनेश कापगते, अभियंता रियाझ शेख, अभियंता आर्शिष कटरे, अभियंता अरुण बिसेन इत्यादी उपस्थित होते. स्वप्नील याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बहिण, आजोबा यांना दिले आहे. स्वप्नील याला भारतीय महसूल सेवा प्रदान करण्यात आली आहे.