जिल्ह्यातील काँग्रेसचे शिष्टमंडळ १९ ला जाणार दिल्ली

0
11

गोंदिया,दि. १२:,-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवरुन रंगलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित जि.प.पदाधिकारी,सभापती,प.स. व जि.प.सदस्य आपली भूमिका पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्याकडे सादर करण्यासाठी येत्या १९ ऑगस्टला दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.या दिल्ली भेटीत काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य अशा ५० जणांचा शिष्टमंडळ आमदार गोपालदास अग्रवाल व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात जाणार आहे.गोंदिया भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला संपविण्यासाठी कशापध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत काम केले याचा सविस्तर पाढा सोनिया गांधी समोर ठेवण्यात येणार आहे.गोंदिया नगरपरिषदेत काँग्रेससोबत करण्यात आलेल्या विश्वासघाताचे प्रकरण असो की गोंदिया बाजार समितीच्या सभापती पदाचा विषय आदी सर्व विषयांची माहिती देत गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठीच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती पटवून दिली जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली.