जिल्हा परिषदेत अधिकाèयाकडून महिलांचे लैगिक शोषण

0
15

गोंदिया,दि. १२:-जिल्हा परिषदेच्या एका विभागातील दोन महिलां कर्मचाèयाच्या मोबाईलवर मॅसेज व इतर गोष्टी पाठवून त्यांच्या लैंगिक छळ करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही महिला कर्मचारीनी आपली तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केली असून त्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेतील महिला तक्रार निवारण समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.या चौकशीच्या प्रमुख जिल्हा परिषद कृषि विभागाच्या कृषी विकास अधिकारी असून त्यांनी चौकशी सुध्दा सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली.चौकशीसाठी संबधित अधिकारी व कर्मचारी यांना नोटीस देण्यात आली होती परंतु त्यांनी पहिल्या नोटीसीला उत्तर देण्याचे टाळल्याचेही वृत्त आहे.त्यामुळे पुढे काय निर्णय समिती घेत वरिष्ठांना अहवाल सादर करते त्याकडे लक्ष लागले आहे.