अर्जुनी/मोर,दि.04:- आगामी जी.प.,प. स.,नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कुठल्याही आदेशाची वाट न बघता स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी शिवसैनिकांनी एकनिष्ठेने निवडणुकीचा कामाला लागावे असे प्रतिपादन शिवसेनेचे गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन कार्यकर्ता नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील युवासैनिकातर्फे युवासेना महाराष्ट्र सहसचिव निलेश हेलोंडे पाटिल यांना शिवसेनेकडून नागपूर पदवीधर मतदारसंघाची उम्मेदवारी देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू, जिल्हा समन्वयक पंकज यादव,विधानसभा संपर्क प्रमुख बाळा परब,उपजिल्हा प्रमुख शैलेश जायसवाल,उपजिल्हा महिला संघटिका ममताताई पवार,युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम,प्रवीण शिंदे(तिरोडा),ललित मुथा(आमगांव),तालुका महिला संघटिका कल्पना श्यामजी शहारे,आदि प्रामुख्याने उपस्थित होते.