राज्य कर्मचाèयांच्या लाक्षणिक संपाला गोंदिया उत्स्र्फुत प्रतिसाद

0
11

गोंदिया दि. २ : विविध मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता.या संपाला गोंदिया जिल्ह्यातही उत्स्र्फुत प्रतिसाद मिळाला आहे.जिल्हा मुख्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद,वनविभागसह इतर शासकीय कार्यालय ओसाड पडले होते.गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 7000 च्या वर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर सुध्दा कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.पंचायत समिती व तहसिल कार्यालयासमोर कर्मचारी संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुध्दा धरणे आंदोलन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात राज्य कर्मचारी संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी. शहारे,ग्रामसेवक संघटनेचे कार्तिक चव्हाण,लेखा संघटनेचे शैलेष बैस,अपंग संघटनेचे जी.जे.बिसेन,लोहबरे,अर्चना आयचित,मनिषा चौधरी,वनिता दखने,अंगनी उपरीकर,तेजेस्विनी चेटुले, नरेंद्र रामटेककर, नेवारे, गजभिये, राणे, आर.आर.मिश्रा,चर्तुथ श्रेणी कर्मचारी संघटनेचे लिलाधर तिबुडे, के.व्ही.नागफासे, संजय धार्मिक, रविंद्र नागपुरे, विठ्ठल भरणे, डॉ. एल.यु.यादव,महाराष्ट्र राज्य लिपीक वर्गीय कर्मचारी संघाचे गुणवंत ठाकूर,प्रमोद काळे,संतोष तोमर,अजय खरवडे,अभियंता संघटनेचे वासुदेव रामटेककर, प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे ,टी.टी.पटले,सुभाष खत्री,संतोष तुरकर,मनोज मानकर,विस्तार अधिकारी संघटनेचे जी.टी.सिंगनजुडे,,के.एच.चौरावार, आदी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यां आंदोलनात सहभागी झाले होते.या बँदमध्ये बँकासह पोस्ट युनीयन,दुरसंचार विभाग,पाटबंधारे विभाग,लालबावटा,भारतीय कम्युनिस्टसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.