ब्रेकिंग न्यूज:काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन; कोरोनाशी झुंज अपयशी

0
62

पुणे(वृत्तसंस्था)– काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तसेच, 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या निधनाची पुष्टी केली.

काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव ता. २५ एप्रील पासून पुणे येथील जहाँगिर हॉस्पीटल येथे कोविडवर उपचार घेत होते.२९ एप्रील रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. तर मुंबईल येथील डॉ. राहुल पंडीत, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.