रासायनिक खत व कीटकनाशकांच्या किमतीत झालेली वाढ कमी करा : खा.पटेलाना निवेदन

0
31
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे), दि.16-लवकरच शेतीच्या खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. शेतकर्‍यांची दरवर्षीच शेती तोट्यात जात आहे. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या किमतीत झालेली वाढ शेतक-यासाठी डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षीच्या भाववाढीने शेती परवडण्यासारखी राहिली नाही. खर्च जास्त व उत्पन्न कमी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे रासायनिक खत व कीटकनाशक यांच्या किमतीत होत असलेली वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी कळकळीची मागणी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर परसुरामकर, लोकपाल गहाणे व किशोर तरोणे यांनी राज्यसभा सदस्य खा.प्रफुल्ल पटेल यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, केंद्र सरकारने शेतीसाठी लागणा-या रासायनिक खत व कीटकनाशक यांच्या किमतीत दिडपटीहुन अधिक वाढ केलेली आहे. यामुळे आधीच कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोना काळात शेतक-यांनी उत्पादित केलेल्या मालाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक हाल झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत शेतीला लागणा-या अनेक वस्तुच्या किंमती भरमसाठ वाढून आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतीला लागणा-या उर्वरकांच्या किमतीत वाढ करुन एकप्रकारे शेतकर्‍यांची थट्टा चालविलेली आहे.