जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान व रक्तदान शिबिर

0
32

गोंदिया- शेतकर्‍यांची परिस्थिती सावरावी तसेच त्यांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल आहे. त्याच अनुसंगाने जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष जितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किसान काँग्रेसच्या वतीने शेतकरी सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शेतकर्‍यांच्या उत्पादिक मालाला हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोग लागु व्हावा, यासाठी काँग्रेस केंद्र शासनाला वारंवार पाठपुरावा करीत आहे. त्यातच राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला सोयी सुविधा शेतकर्‍यांना अजून किती चांगल्या प्रकारे देता येतील, यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल आहे. शेतकर्‍यांचे हित काँग्रेस पक्षात आहे. ही बाब हेरून जिल्हा काँग्रेस किसान संघटनेचे अध्यक्ष जितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेवराव किरसान, माजी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे, राजकुमार पटले, राजीव ठकरेले, जीवन शरणागत यासह किसान काँग्रेस संघटनेचे सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.