काँग्रेसच्या मोच्र्याची विधानभवनावर धडक,सरकार गोंधळले

0
10

नागपूर दि-८:- हिवाळी अधिवेशनाच्या दुसèया दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या आक्रमकतेमुळे सरकारची तारांबळ उडाली. स्वतंत्र विदर्भाबाबत महाभियोक्ता श्रीहरी अणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, शेतकèयांच्या आत्महत्या, शेतकèयांची कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव अशा मुद्यांवर कॉंग्रेसने विधान भवनावर काढलेला भव्य मोर्चा, विधानभवनांच्या प्रवेशद्वारावर दोन्ही कॉंग्रेसने केलेले आंदोलन आणि सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी कामकाज रोखल्याने सरकारची कोंडी झाली.

राज्य सरकारचा गेल्या वर्षभरातील कारभार आणि शेतकèयांच्या प्रश्नांवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली विधान भवनावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. त्या नंतर मोर्चात सहभागी झालेल्या कॉंग्रेसचे सर्व आमदार कापडी बँनर आणि फलक घेऊन विधान भवनावर धडकले. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कॉंग्रेस आमदारांनी साथ दिली. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सुरू केली.

‘काहॉं कहॉं है कहॉं है अच्छे दिन कहॉं है‘, ‘शेतकèयांची कर्जमाफी झालीच पाहिजे‘, ‘तुरडाळ घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे‘ अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला. विरोधकांच्या या आक्रमक आंदोलनात माजी उपमुख्य मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, हसन मुश्रीफ, माणिकराव ठाकरे, सुनिल केदार यांच्यासह असंख्य आमदर उपस्थित होते.
वर्षपूर्ती झालेल्या युती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने जोरात मोर्चेबांधणी केली आहे. शेतकèयांच्या आत्महत्या, कर्जमाफी, नुकसानभरपाई, महागाई, वाढती गुन्हेगारी आदी मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसच्या मोर्चाला सर्मथन दिल्याने सभागृहात चांगलेच गोंधळ उडाले होते.काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.या मोर्चात अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उपनेते आ. विजय वडेट्टीवार,माजी खासदार विलास मुत्तेमवार,माजी मंत्री नितिन राऊत,सेवक वाघाये,नामदेवराव उसेंडी यांच्यासह काँग्रेसचे राज्यभरातील नेते, आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी आमदार, पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोर्चात नागपूरसह विदर्भातील काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिलांचा मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.