स्वीकृत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

0
16

अर्जुनी-मोरगाव : नगर पंचायत निवडणुकीनंतर पदाधिकारी सत्तारुढ झाले.भाजप व काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाली खरी, मात्र पात्रता निकषाच्या पूर्ततेवरून स्विकृत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी प्रभारी मुख्याधिकार्‍यांना ३0डिसेंबर रोजी अभिप्रायासह अहवाल मागविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नगर पंचायतची निवडणूक १नोव्हेंबर रोजी पार पडली. यात १७ सदस्य निवडून आले. स्विकृत सदस्य नेमणुकीसाठी भाजप व काँग्रेसला प्रत्येकी एक सदस्य देण्याची संधी मिळाली. काँग्रेसतर्फे सर्वेश वल्लभदास भुतडा तर भाजपतर्फे हेमंत पंढरीनाथ भांडारकर यांची वर्णी लागली. नगर पंचायतच्या कार्यकारी मंडळ फलकावर त्यांचे नावही झळकले.
मात्र प्रभाग क्रमांक८ मधील रहिवाशी पुरूषोत्तम हरी लाडे यांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांच्याकडे ११डिसेंबर रोजी तक्रार केली. या तक्रारीत स्विकृत दोन्ही सदस्यांनी सादर केलेल्या अर्हता पूर्ण केल्या नसल्यामुळे सभासदत्वास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी केली.