सैनिकी शाळेमुळे विदर्भाच्या विकासात भर — ना. सुधीर मुनगंटीवार

0
7

चंद्रपूर,दि.7-राज्यातील दूसरी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्हयात होणार असून ही शाळा झाल्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सारख्या आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यातील मुलांना या शाळेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. चंद्रपूरच्या सैनिकी शाळेमुळे विदर्भाच्या विकासात भर पडणार असल्याचे वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सैनिकी स्कुल सोसायटीचे कॅप्टन जी. रामबाबू व अवर सचिव एन. बी. मणी यांच्या समवेत पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी आज विसापुर नजिक असलेल्या सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी केली.

यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ ठुबे, अधिक्षक अभियंता डी. क़े. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्‍वाल व अधिकारी उपस्थित होते.