रहिवासी वसाहतीत मनोरुग्णांचा दवाखाना

0
14

गोंदिया :दि.8- शहरातील सिव्हील लाईन्ससारख्या रहिवासी भागात मनोरूग्णांचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रकार सुरू आहे. यासाठी नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना अंधारात ठेऊन डॉ.शिबू आचार्य यांनी नगर परिषदेकडून परवानगी मिळवून घेतली. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अँक्ट १९४९ चे यात पालन करण्यात आले नसल्याने दवाखान्याचा परवाना रद्द करून सदर डॉक्टरवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डॉ.आचार्य यांना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी, तसेच शासन आदेशाचा चुकीचा उपयोग करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोसफ फिलीप्स, पी.मेश्राम, एस.कपाटिया, नवरतन अग्रवाल, टी.पी.परमार, लतीफ शेख, विवेक जगताप, अशोक यादव, शंभू सोनी, अतूल हलमारे, रवि हलमारे आदिंनी केली आहे.
येथील मानसिक रोग तज्ज्ञ डॉ.शिबू आचार्य यांच्या दवाखान्याचे काम सिव्हील लाईन्स हनुमान चौक परिसरात सुरू आहे. या परिसरात दवाखाना सुरू करण्यासाठी त्यांनी नगर परिषदेकडून २0 जानेवारी २0१२ रोजी १0 खाटांची परवानगी मिळवून घेतली आहे. नगर परिषदेने त्यांना ही परवानगी दिलीच कशी याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
यामध्ये डॉ. आचार्य यांनी जाणून नगर परिषद अधिकार्‍यांना अंधारात ठेऊन त्यांची दिशाभूल केली व परवानगी मिळवून घेतल्याचे नागरिकांच्या तक्रारीत म्हटले आहे.
मानसिक रूग्णांसाठी रहिवासी क्षेत्रात दवाखाना (क्लिनिक) सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मनाई असून तसा उल्लेख आहे. तरिही डॉ.आचार्य मानस रुग्णांचे क्लिनिक सुरू करीत असून त्यांच्याकडे तशी परवानगी आहे.