भाजपनंतर काँग्रेसला धक्का देत धकातेंनी बांधले मनगटावर शिवबंधन!

0
68

भंडारा,दि.08ः-शहरातील दोन नगरसेवकांनी Shivbandhan बांधत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.त्यामध्ये  एक नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले अपक्ष तर दुसरे भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले असले तरी काही दिवसांपासून काँग्रेसवासी झालेले नितिन धकाते यांचा समावेश आहे.आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकासात्मक कार्यक्रमाला बघून धकाते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चांगले मात्र भंडारा शहराच्या विकासाबाबत काँग्रेस नकारात्मक असल्याचे सांगत एकप्रकारे पटोलेंच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत धकाते यांनी आपली राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी ,भाजप,काँग्रेस करीत शिवसेनेकडे नेली आहे.