गोंदियातील अपक्ष आमदार अग्रवालांच्या कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांचा हल्ला

0
165

गोंदिया,दि.27-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सुरवातीला महाविकास आघाडीला साथ दिल्यानंतर गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडीबघून त्यांनी आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाला जाहीर केला.तसेच महाविकास आघाडीच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवळ यांच्याविरुध्द अर्ज दाखल केला होता.तसेच आपण भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे जाहिर केले होते.त्यानंतर आज गोंदियात त्यांच्या या प्रतिक्रियेचे पडसाद उमटले असून शिवसेनाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या का्र्यालयावर हल्ला करीत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.याचा व्हीडीओच समोर आला आहे.या शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात आमदार अग्रवाल समर्थांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.