जिल्ह्यात सुरू असलेली अवैध जड वाहतूक बंद करा

0
18

गोंदिया-जिल्ह्यामध्ये मागील अनेक महिन्यापासून जागोजागी रस्त्याचे काम सुरू आहे, गोंदिया शहरात तर भूयारी गटारी योजनेचे कामसुद्धा सुरू आहे. तसेच या अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकाम चालू असल्यामुळे यावर्षी मागील चार महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे गोंदिया शहर तसेच जिल्हातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. त्यात जड वाहतुकीने परिस्थिती आणखीच गंभीर झाली असून, जडवाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्य जनतेची तक्रारी लक्षात घेता जिल्ह्यात सर्वत्र जड वाहतूक दिवस रात्रं सुरू आहे. त्यामुळे नागरिकाना येणे जाने करण्याकरीता खूपच त्रास सहन करावा लागत आहे. शासनानी ठरवून दिलेल्या नियमानुसार क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे कायदेशिररित्या गुन्हा आहे. उपरोक्त कारणामुळे जिल्ह्यात दिवसेदिवस रस्त्यामुळे होत असलेले दुर्घटना वाढलेले आहेत. जिल्ह्यात होत असलेले अवैध वाहतुक आणि प्रवासी वाहतुक ताबडतोड थांबवावी. अन्यथा, काँग्रेस पक्षातर्फे दिवाळी नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि निर्माण होणार्‍या परिस्थितीला परिवहन विभाग जवाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जितेंद्र कटरे, गोंदिया शहर काँग्रेस अध्यक्ष जहीर अहमद, ग्रामीण काँग्रेस तालुकाध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, ओबीसी जिल्हा महासचिव जीवनलाल शरणागत, ओबीसी जिल्हा सचिव अजय रहांगडाले, अध्यक्ष तुमखेडा बु. घनश्याम पटले, राजेंद्र तुरकर, ओमप्रकाश मचाडे, योगेश पारधी, साहिबलाल बिसेन, नीरज पटले, सागर वघेला, अनुज रहांगडाले, दिवेश रवींद्र सतीसेवक, अर्पित बंसोडे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.