37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय शरद पवारांची प्रकृती बिघडली:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू

शरद पवारांची प्रकृती बिघडली:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू

0
83

blank

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक पत्र काढून ही माहिती देण्यात आली. पुढचे तीन दिवस पवारांवर उपचार होणार असल्याचे समजते.

काय म्हटले पत्रात?

राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्र काढून शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.

blank

कधी मिळणार डिस्चार्ज?

पत्रात पुढे म्हटले आहे की, शरद पवारांना 2 नोव्हेंबर 2022 रोजी डिस्चार्ज मिळेल. ते 3 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 व 5 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये.

blank