खरीप पीक हंगाम सुधारीत पैसेवारी 47 पैसे 

0
14
वाशिम दि.31 जिल्ह्याच्या खरीप पीक हंगाम सन 2022 -23 ची प्रमुख पिकांची सुधारीत पैसेवारी सर्व तहसीलदारांकडुन प्राप्त झाली आहे.जिल्ह्यातील एकूण 793 महसूल गावांची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी आहे.
       तालुकानिहाय तालुक्यात समाविष्ठ गावांची संख्या आणि खरीप हंगामात सुधारीत पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेल्या गावांची पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे. वाशिम तालुका – 131 गावे,पैसेवारी 47 पैसे, मालेगाव तालुका -122 गावे, पैसेवारी 48 पैसे,रिसोड तालुका – 100 गावे,पैसेवारी 46 पैसे, मंगरुळपीर तालुका – 137 गावे, पैसेवारी 47 पैसे, कारंजा तालुका – 167 गावे,पैसेवारी 47 पैसे आणि मानोरा तालुका – 136 गावे,पैसेवारी 47 पैसे अशी आढळून आली आहे.
            जिल्ह्यातील 793 गावातील प्रमुख पिकांची काढण्यात आलेली सरासरी सुधारीत पैसेवारी 47 पैसे आहे. या सुधारीत पैसेवारीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी मान्यता दिली आहे.