“संजय राठोड प्रकऱण चित्रा वाघ यांना चांगलंच झोंबल👉थेट पत्रकारांवरच भडकल्या

0
23

👉संजय राठोडांच्या प्रश्नावरून चित्रा वाघ संतापल्या;👉नेमकं काय घडलं ?

👉पत्रकार परिषदेत संजय राठोडांवरील प्रश्न विचारताच चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या.’

यवतमाळ :-महाविकास आघाडी सरकार असताना संजय राठो़ड प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ चर्चेत आल्या होत्या. पुजा चव्हाण हिला न्याय मिळून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. परंतु आता शिंदे- फडणवीस राज्यात आल्यानंतर चित्रा वाघ शांत झाल्याचं बघायला मिळालं. त्यातच आता त्यावरून त्या पत्रकारांना चांगल्याच भडकल्या.

चित्रा वाघ यांना भाजपने अलिकडेच महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद सोपवलं आहे. त्यामुळे सध्या त्या राज्याच्या दौऱ्यावर असून महिलांविषयी सुरक्षितेचा आढावा घेत आहेत. मात्र यातच यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत संजय राठोड यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यास त्यांच्यावर चित्रा वाघ चांगल्याच संतापलेल्या दिसून आल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर संजय राठो़ड प्रकरणाविषयी चित्रा वाघ यांना सातत्याने विचारणा केली जात आहे. त्यामुळे एका दिवसापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राठोड हा विषय माझ्यासाठी संपला आहे. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यातच आज देखील त्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मला काही कायदा शिकवू नका, जा तुम्ही. तसेच अशा पत्रकारांना का मला प्रश्न विचारण्यासाठी बोलताहेत. असं म्हणत त्यांनी संजय राठोड प्रकरण आता चांगलंच झोबंल असल्याच दिसत आहे.

दरम्यान,एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले.आघाडी सरकार असताना ज्या नेत्यांवर भाजपनी टिका केली होती. त्या नेत्यांनाही शिंदे सरकारमध्ये स्थान देण्यात आलं. त्यानंतर मग भाजपचे नेते या नेत्यांबाबत मवाळ झाल्याचं दिसून आलं. यावरून आता भाजपच्या नेत्यांना सातत्याने या प्रकऱणांविषयी विचारणा केली जात आहे.

‘आपण ज्या प्रकारे आरोप करत आहेत, त्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही कोर्ट आहात ? तुम्ही न्याय देणार आहात का ? मी स्वत: कोर्टात गेली आहे. माझा लढा सुरू आहे, अशाही चित्रा वाघ म्हणाल्या. ‘या असल्या पत्रकारांना बोलावू नका, सुपारी घेऊन आम्हाला प्रश्न विचारायला येतात, अशा शब्दात चित्रा वाघ या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संतापल्या.चित्रा वाघ यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.