भागी/शि, सिरेगावबांध ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समीतीकडून तपासणी

0
31

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा

* राज्यातील 13 ग्रामपंचायतीची होणार तपासणी*

       गोंदिया, दि.11 :   पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2018-19 या वर्षातील राज्यस्तरीय तपासणी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी देवरी तालुक्यातील भागी/शि व 8 नोव्हेंबर रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरेगावबांध येथे पार पडली.

          तपासणीकरीता राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे, समितीचे सदस्य तथा पाणी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, समिती सदस्य तथा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहायक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांची उपस्थिती होती. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषदेच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा (सन 2018-19) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.

           7 नोव्हेंबर रोजी देवरी तालुक्यातील भागी/शि या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. आदिवासी बहुल असलेल्या या गावात गावाच्या वेशीपासून गोंडी नृत्याची झलक दाखवून समितीचे स्वागत करण्यात आले. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला तसेच बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तपासणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय तपासणी समितीचे अध्यक्ष व सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर, गटविकास अधिकारी देवरी दीपक ढोरे, सरपंच धनराज कोरोंडे, विस्तार अधिकारी पराते, ग्रामसेवक वाघमारे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले, सूर्यकांत रहमत्कर,  विशाल मेश्राम, गट समन्वयक भिमराज पारधी, गट शिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक, आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         8 नोव्हेंबर रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. गावाच्या वेशीपासून राष्ट्रसंताच्या भजनाने सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत समितीचे ग्रामपंचायत परिसरात आगमन झाले.

          समितीच्या वतीने दोन्ही गावात पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, शाळा व आंगणवाडी, लोकसहभाग आदी घटकांची तपासणी करण्यात आली.

               सिरेगावबांध येथे समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यासह गटविकास अधिकारी विलास निमजे, जिल्हा परिषद सदस्या रचना गहाने, पंचायत समिती सदस्या, माजी सरपंच हेमकृष्ण कापगते, सहायक गटविकास अधिकारी अरुण गिरहेपुंजे, विस्तार अधिकारी सिंगणजुडे, ग्रामपंचायत प्रशासक बंडगर, विस्तार अधिकारी ब्राह्मणकर, विस्तार अधिकारी आरोग्य मोरेश्वर धोंगडे, ग्रामसेवक समीर रहांगडाले, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे भागचंद्र रहांगडाले, अतुल गजभिये, दिशा मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक व आंगणवडी सेविका, गट समन्वयक हेमराज अंबुले, समूह समन्वयक उमेंद्र भगत यांच्यासह पंचायत समिती पातळीवरील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

             राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी चंद्रकांत मोरे, समिती सदस्य सचिव बाळासाहेब हजारे, समिती सदस्य राजेश पात्रे यांचा दोन्ही गावात शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

               राज्यातून 14 ग्रामपंचायती ठरल्या होत्या राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र

              सन 2018-19 या वर्षांत जिल्हास्तरीय तपासणी करण्यात येऊन प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या  प्रत्येक जिल्ह्यातून दोन ग्रामपंचायती या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर विभागीय तपासणीत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. राज्यस्तरीय स्पर्धेत कोंकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या सहा विभागातून 14 ग्राम पंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. नागपूर विभागातून कामठी तालुक्यातील महालगावं तसेच गोंदिया जिल्ह्यातून भागी व सिरेगावबांध या दोन्ही ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या.