माजी आमदार जैन यांच्या उपस्थितीत वडेगाव जि.प.क्षेत्राची आढावा बैठक संपन्न

0
27

तिरोडा– वडेगाव जि.प.क्षेत्राची ग्राम वडेगाव येथे छोटेलाल बिसेन यांच्या निवास स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, रविकातं बोपचे,राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, निताताई रहांगडाले, सुनीता मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. वडेगाव जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी ग्रामपंचायत निवडणूक, पक्ष संघटन व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.

आगामी ग्रामपंचायतच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी सक्रिय व कार्यक्षम उमेदवारांची निवड करून योग्य नियोजन करावे अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रत्येक गावात बूथ कमिट्या तयार कराव्यात वार्ड प्रमुख, प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख, ग्राम प्रमुख नेमणूक करून निवडणुकांची परिपूर्ण तयारी करावी तसेच पक्ष सभासद नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून संघटनेला मजबुती प्रदान करावी. आपण आपल्या पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करुन जास्ती जास्त सरपंच व सदस्य आपण जिंकू शकतो असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, निताताई रहांगडाले सुनीता मडावी, डॉ संदीप मेश्राम, रोशन बडगे, डॉ मुकेश पटले, शिबीरकुमार चोले, वीरेंद्र इळपाटे, संजय रहांगडाले, प्रमिला टेम्भेकर, चंदाबाई शर्मा, छोटेलाल बिसेन, रवी भगत, पिंटू रहांगडाले, नासिर घाणीवाला, रमेश पटले, बाळू उईके, मुकेश भांडारकर, तेजराम टेम्भारे, गिरधारी रहांगडाले, लखन रहांगडाले, मधुकर दहीकर, मिलिंद रामटेके, महेंद्र पटले, छोटेलाल तुरकर, अरविंद ठाकरे, मोरेश्वर ठाकरे, समीर फटिंग, खेमन रहांगडाले, रमेश भगत, सय्यद काका, अरुण रहांगडाले, रवींद्र कुलपती, वासुदेव लामकासे, निळू भेलावे, अहिल्या भेलावे, सुवर्णमाला साखरे, भाग्यश्री केळवंदकर, उलास रहांगडाले, प्रभू पटले, रवी सुर्यवंशी, नितीन बिसेन, युवराज राणा, सुरेश बरेकर, तेजराम अंबुले, अभिमन बिंझाडे वडेगाव जि.प.क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

यावेळी खासदार  प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून  जयदेव नेवारे,  जगन्नाथ मेश्राम, विजय धमगाये, अरविंद कोबडे, बसंत नेवारे, अल्ताब शेख , विजय गौतम, सुशील बोपचे, रोहित मेश्राम,आकाश मरस्कोल्हे सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, राजलक्षमी तुरकर, रविकांत बोपचे, प्रेमकुमार रहांगडाले यांनी पक्षप्रवेशितांना पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले व पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्यात.