१५ वर्षांनंतर जिल्ह्याला मंत्रिपद

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.15 वषार्नंतर गोंदिया जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले आहे.1995-99 या काळात युतीचेच सरकार असताना प्रा.महादेवराव शिवणकर हे मंत्री होते.त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नव्हते.15 वषार्नतर मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यातील विकासाच्या आशा उचांवल्या आहेत.पालकमंत्रीपद सुध्दा जिल्ह्यातच राहील ही आशा आहे. गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरीसह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.आ. बडोले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार याची कुणकुण होती. मात्र शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी ४.३० च्या सुमारास बडोले शपथग्रहण करतानाचे लाईव्ह चित्रण वृत्तवाहिन्यांवरून पाहताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

राजकारणात नवीन तरीही वरिष्ठ आमदार

यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ६ पैकी ५ आमदार हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडल्या गेले आहेत. त्यापैकी राजकुमार बडोले हे सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे सध्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ते भाजपचे वरिष्ठ आमदार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून २००९ मध्ये जिल्हा परिषदेत शाखा अभियंत्याची नोकरी सोडून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आमदार झाले.यावेळच्या निवडणुकीत पुन्हा मतदारांनी आमदारकीची माळ बडोले यांच्या गळ्यात टाकली.