नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. सलग तीन आठवडे विरोधी पक्षाची भूमिका निभावणारी शिवसेना भाजपासोबत युती करत शुक्रवारी सत्तेत सहभागी झाली. भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेना- भाजपा मिळून२० मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळ प्रांगणात पार पडला.
खातेवाटप खालीलप्रमाणे :
कॅबिनेट मंत्री
भाजपा – गिरीश बापट – अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कामकाज, गिरीश महाजन – जलसंपदा, चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा, बबनराव लोणीकर – पाणीपुरवठा व स्वच्छता, राजकुमार बडोले – सामाजिक न्याय,

शिवसेना-दिवाकर रावते – परिवहन, सुभाष देसाई – उद्योग, रामदास कदम – पर्यावरण, एकनाथ शिंदे – सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), डॉ. दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण

राज्यमंत्री : भाजपा – प्रा. राम शिंदे – गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन, विजय देशमुख – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग, राजे अंबरीश अत्राम – आदिवासी विकास, डॉ. रणजित पाटील – विधी व न्याय, प्रवीण पोटे-पाटील – उद्योग व खणीकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम

शिवसेना – संजय राठोड – महसूल, दादा भुसे- सहकार, विजय शिवतारे – जलसंपदा, जलसंधारण, दीपक केसरकर – वित्त, ग्रामविकास, रवींद्र वायकर – गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण