प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी येथे हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम यशस्वी

0
24
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया -जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड राज्याच्या सिमाला लागुन असलेले अतिदुर्गम व जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी अंतर्गत 6 गावात 76 मुलांचे रक्त तपासणी करुन हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम यशस्वी पार पडली.
गोंदिया जिल्हा देवरी तालुका हत्तीरोग आजाराबाबत संवेदनशिल जिल्हा असल्याने राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष 2004 पासून हत्तीरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यात एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम अंतर्गत वयोगटानुसार डि.ई.सी व अल्बेंडेझॉल गोळ्यांची मात्रा लोकांना सेवन करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या व राज्यस्तरावरून सहसंचालक (हिवताप व हत्तीरोग) पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सामुदायिक औषधोपचार मोहीम सुरू करण्याच्या अगोदर समुदयामध्ये हत्तीरोग जंतूचा भार किती प्रमाणात आहे याचे सर्वेक्षण म्हणजेच टास करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी अंतर्गत वडेकसा ,महाका,ककोडी,केशोरी,वांढरा,मिसपिरी ई. गावमध्ये टास मोहिम राबिण्याचे निर्देष प्राप्तझाल्याची माहिति वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदिनी रामटेकेकर यांनी दिली आहे. दि. 16 मे रोजी वडेकसा व महाका , दि.17 मे रोजी ककोडी, दि.18 मे रोजी केशोरी व वांढरा, दि.19 मे रोजी मिसपिरी येथे टास मोहिम राबिण्याचे नियोजन जिल्हास्तरावरुन करण्यात आल्याची माहिती ह्यावेळी त्यांनी दिली. टास सर्वेक्षणामध्ये जिल्हास्तरावरुन आरोग्य प्रशासनामार्फत पथक निर्माण करण्यात आले होते त्या नुसार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत खरात यांच्या उपस्थितित वडेकसा येथे 7, महाका येथे 11, ककोडी येथे 23, केशोरी येथे 13, वांढरा येथे 9 व मिसपिरी येथे 13 असे एकुण 76 मुलांचे रक्त तपासणी करण्यात आले सगळे निगेटिव्ह आढ्ळले.
एम.डी.ए. सुरू झाला त्यानंर वयोगट सहा ते सात वर्षाची मुलांच्या मध्ये हत्तीरोगाचे जंतू विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक आढळले म्हणजे क्रियाशील हत्तीरोग संक्रमणाची खूण होय.म्हणुन आजही पूर्वीच्या हत्तीरोग प्रवण भागात हत्तीरोगाचे संक्रमण सुरू आहे याची पडताळणी करण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे टास.
टास सर्वेक्षणामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदिनी रामटेकेकर , आरोग्य  सहाय्यक प्रविण मसराम व भोयर , आरोग्य सेवक टेंभुर्णे , मोहुले व रामटेके, आरोग्य सेविका थोटे, कलमकर ,बोरकर, पटले , आशा सेविका बेबीबाई अंबादे, उर्मिला उईके, उर्मिला मडावी, निर्मला अंबादे,शोभा राऊत ,किरण डोंगरे उपस्थित होते.