भाजप किसान आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे व राजेंद्र पटलेंची निवड

0
12

गोंदिया,दि.30-भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणीची  घोषणा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी केली.यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जेष्ठ नेते नेतराम कटरे यांची प्रदेश कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी निवड केली  आहे.सोबतच भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हक्कासाठी लढणारे इंंजि.राजेंंद्र पटले यांचीही प्रदेश उपाध्यक्षपदावर निवड कऱण्यात आली आहे.