भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्षपदी अजय मेश्राम यांची निवड

0
4

भंडारा:-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत दिलेल्या योगदान लक्षात घेऊन अजय गोपीचंद मेश्राम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) भंडारा- पवनी विधानसभा अध्यक्षपदी निवड शासकिय विश्रामगृह येथे नुकतीच  करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी अतिशय उत्तम रित्या करून पक्ष मजबूत करत आहेत. त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्र पवार यांचे विचार क्षेत्रात पोहोचवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असल्याने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, तालुका अध्यक्ष ईश्वर कळंबे, अरूण गोंडाणे, सुकराम अतकरी, वरकडे, महासचिव दिलीप सोनुलेआदींच्या उपस्थितीत जिल्हयातील विविध पदावर अनेकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटाच्या) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, सुकराम अतकरी, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे