मंत्रिमंडळ बैठकीला दांडी ; खडसे मुक्ताईच्या दर्शनाला

0
8
 वृत्तसंस्था
मुंबई- 30 कोटींची लाच, पुण्यातील भूखंड गैरव्यवहार आणि दाऊदशी कथित संबंध यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला चक्क दांडी मारत चक्क आपल्या मतदारसंघात म्हणजेच मुक्ताईनगर जाणे पसंत केले आहे. खडसेंनी कॅबिनेटला उपस्थित राहण्यापेक्षा मुक्ताईनगर येथील कोथळी येथे संत मुक्ताई तिरोभूत समाधी सोहळ्याला जाणे पसंत केले आहे. संत मुक्ताईचा आशिर्वाद घेऊन खडसे मोठा निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे.
आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसेंवर कारवाई करण्याबाबत 48 तासांची (बुधवारपर्यंत) मुदत दिली आहे. अन्यथा आपण हॅकर मनिष भंगाळे, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खडसेंवर कारवाई करण्यासाठी भाजप व मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याचे मानले जात आहे.