शिवसेना नेत्या अंधारे का म्हणाल्या….“प्रफुल्ल पटेल यांनी विसरू नये की…”

0
14

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देवाण:घेवाण करून उमेदवार दिल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह प्रफुल पटेलांवर जोरदार टीका केली.तसेच . काँग्रेस, शिवसेनेने तळागाळातील लोकांना संधी दिली. प्रफुल्ल पटेल यांनी विसरू नये की त्यांची सुरुवात कुठून आणि कशी झाली. कुणालाही हीन लेखणे, तुच्छ समझने ही भाजपाची संस्कृती आहे. कदाचित प्रफुल्ल पटेल हे भाजपाच्या संगतीला गेल्यामुळे त्यांनीही तुच्छ भाषेचा अवलंब केला असेल, असे अंधारे म्हणाल्या.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे गोंदियात आल्या असता प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाल्या.

नाना पटोले यांच्या अपघाताविषयी संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर त्या म्हणाल्या की, मुर्ख लोकांना आपण काय उत्तर द्यायचे. ते अत्यंत बोलघेवडे आहेत. ज्यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट नाही, महिलांशी कसे बोलायचे हे त्यांना कळत नाही, एखादी माय माऊली त्यांना भाऊ म्हणत असेल परंतु भाऊ म्हणवून घेण्याची त्यांची योग्यता नाही. अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण फार लक्ष देऊ नये

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांना अय्याश, लफडेबाज माणूस म्हटल्याबद्दल सुषमा अंधारे म्हणाल्या की,माझा एक दर्जा आहे आणि ते मला सांभाळून ठेवायचा आहे. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर मी जाऊ शकत नाही.अशा आक्रस्ताळ्या बायकांबद्दल आपण बोलू नये, असे म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला.