नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक धक्के दिले. काही ठिकाणी घराणेशही संपुष्टात आली तर काही ठिकाणी ती उदयास आली. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर हे दोन मतदारसंघ याचे उदाहरण ठरावे. काटोलमध्ये ३० वर्षापासून वर्चस्वस्थापन करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख पराभूत झाल्याने तेथील घराणेशाहीला ब्रेक लागला.काटोल मतदारसंघातून १९५ ते २०१९ अशा या दरम्यान फक्त २०१४ वगळता अनिल देशमुखच पंचवाीस वर्षापासून विजयी होत आले आहे. अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला अशी ओळख काटोल मतदारसंघाची होती. २०२४ मध्ये स्वत: देशमुख रिंगणात न उतरता त्यांनी मुलगा सलील देशमुख यांना रिंगणात उतलवले त्यांचा भाजपचे चरणसिंह ठाकूर यांनी यावेळी पराभूत करून काटोलमधील देशमुख राज्य संपुष्टात आणले. काटोलची निवडणूक अनेक अर्थाने महत्वपूर्ण होती. माजी गृहमंत्री विरुद्ध विद्यमान गृहमंत्री अशी किनार या निवडणुकीला देशमुख विरुद्ध फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्षामुळे लागली होती.या पार्स्वभूमीवर काटोलच्या भूमीत देशमुखांचा भाजपने केलेला पराभव महत्वाचा मानला जातो.