जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर – आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत गोंधळ घातला होता, तसेच आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर आव्हाड यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला होता तसेच राषट्रवादीने कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
आव्हाड यांनी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले होते.
मात्र आज अधिवेशन सुरू झाल्यानंतर आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले