30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे;उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे;उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी

0
30

वेंगुर्ला-वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे मातोंड पं. स. सदस्य शंकर शशिकांत घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे परुळे पं. स. सदस्य सचिन दामोदर देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी 9 मार्च 2026 रोजी झालेल्या सभेनंतर ही निवड जाहीर करण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी उपस्थित होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक – एक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध संपन्न झाली. यावेळी या सभेस शंकर घारे, सचिन देसाई यांच्यासह म्हापण पं. स. सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर, तुळस पं. स. सदस्या सुचिता वजराटकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर,आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, रेडी पं. स. सदस्या प्रियांका घाटवळ व शिरोडा पं. स. सदस्या योगिता परब आदी उपस्थित होते. दरम्यान ही निवड जाहीर होताच प्रशासन तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाप्रमुख पप्पू परब, नगरसेवक प्रणव वायंगणकर व अन्य, सरपंच, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले. सभापती – उपसभापती निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली.

blank