25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय भाजपकडून संजय भेडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी

भाजपकडून संजय भेडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी

0
93
नागपूर : भारतीय जनता पार्टी केंद्रीय समितीने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी संजय भेंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ६ जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
संजय भेंडे यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांमधून कार्य करताना आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा विचार करूनच पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.