मुंबई, दि. 4 – महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात झालेला अटीतटीचा सामना अद्यापही चालू असून हा सामना नेमका जिंकणार कोण याची उत्सुकता वाढू लागली आहे. दोन्ही पक्ष माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून महापौर आपलाच झाला पाहिजे या निर्णयावर ठाम आहेत. त्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्नही दोन्ही पक्षांकडून होत आहे. या शर्यतीत शिवसेना मागे पडल्याचं चित्र असून मनसे आणि एमआयएम भाजपाला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.




