मकरधोकडा शाळेची मान्यता रद्द करणार : श्रीमती खोडे

0
10

गोंदिया,दि.03:-देवरी तालुक्यातील मकरधोकडा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार तसेच आदिवासी समाजावर वाढते अत्याचार, शासनाची उदासिन भूमिका याविरोधात आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारला(दि.३) आदिवासी संघटनाच्या संयुक्तवतीने आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव या मोच्र्यात सहभागी झाले होते.आंदोलकानी देवरी चिचगड मार्ग रोखत आदिवासी अप्पर उपायुक्त माधवी खोडे यांनी आंदोलकांसमोर येऊन भूमिका मांडावी अशी मागणी केली.त्यावर श्रीमती खोडे यांनी आंदोलकांना आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आजपर्यंतच्या सर्व बाबींचा विचार करुन मकरधोकडा आश्रमशाळेची मान्यता कायमची रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार संजय पुराम ,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी हे सुध्दा उपस्थित होते.मकरधोकडाप्रमाणेच जिल्ह्यातील तीन ते चार शाŸळावर सुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितल्यानंतर कार्यालयाला केलेला घेराव आंदोलकांना सोडला.येथील आंतरराष्टदृीय मांझी संघटनेच्या मैदानावरून मोर्चाला सुरवात करून नगरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत प्रकल्प कार्यालयावर मोर्चा धडकला.या आंदोलनात ऑल इंडिया पिपल्स फेडेरशन, आदिवासी विद्यार्थी संघ, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडेरशन, गोंडवाना मित्र मंडळ, हलबा हलबी समाज संघटना, आदिवासी धृव गोंड समाज संघटना, कंवर समाज संघटना, गोंड समाज बहुउद्देशीय सेवा समिती आणि आंतरराष्टदृीय मांझी संघटना सहभागी झाल्या होत्या.