सामनातून दानवेच्या वक्तव्याचा शिवसेनेने घेतला समाचार

0
15
मुंबई, दि. 10 – शेतकरी आत्महत्येसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेत खडसावले आहे. तोंडावर लगाम ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करूनही भाजप पुढाऱ्यांच्या जिभांचे तडतडणे सुरूच आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडला असेल असेही म्हटले आहे.
 रावसाहेब दानवेनी शेतकऱयांच्या दुःखावर मिठ चोळत सांगितले की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टयांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले अशा शब्दात दानवेंवर टीका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी तर, दानवे अशी विधाने तर करत नाही ना ? अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, असे अग्रलेखात म्हटले आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
 सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठीक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे? दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला.
शेती करण्यासाठी तो पुनः पुन्हा कर्ज काढतो व फसत जातो. या दुष्टचक्रातून तो बाहेर कसा पडणार? कधी पीकपाणी बरे झाले तर त्या शेतमालास हमीभाव नाही व तूरडाळीपासून कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते अशी आमच्या शेतकऱ्यांची दैना झाली आहे. या भयंकर दुष्टचक्रातून सुटण्यासाठी तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असेल तर ते मायबाप सरकारचेच अपयश आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले.