24 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home राजकीय माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार अखेर झाले भाजपवासी

माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार अखेर झाले भाजपवासी

0
27

देवरी, दि.12- शिवसेनेचे माजी पं.स. व जि.प सदस्य आणि उपजिल्हाप्रमुख राजेश चांदेवार  हे गेल्या शनिवारी (दि.10) शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत अखेर भाजपवासी झाले.

देवरी तालुका प्रमुख म्हणून राजेश चांदेवार यांनी राजकारणाची सुरवात केली. शिवसेनेच्या तिकीटावर ते एकदा पंचायत समिती सदस्य आणि एकवेळ जिल्हा परिषदेच्या जागेवर निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले होते. शिवसेनेत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली. गेल्या काही महिन्यापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. श्री चांदेवार यांचे सह त्यांचे सहकारी लल्लन तिवारी यांचे सह पंचायत समिती सदस्य गणेश सोनबोईर, धर्मेंद्र जगनीत, नंदकिशोर गायधने, गोंविंद बंसोड, रमेश सोरी यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनसुद्दा काही कार्यकर्त्यांनी  सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. यात श्रीकांत आचले, नवनीत आचले,रोहीत आचले, नाजीम शेख, अफसर शेख यांचा समावेश आहे. यावेळी प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, केशवराव मानकर, भाजपचे  प्रमोद संगीडवार, देवराज वडगाये, यशूलाल उपराडे, लक्ष्मण सोनसर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.