पुत्र रिपाइंच्या बालआघाडीचा अध्यक्ष; वडील पक्षाध्यक्ष, तर अाई महिला अाघाडीच्या प्रमुख

0
13

मुंबई,दि.06(वृत्तंसस्था)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अाठवले गट) या पक्षाच्या बाल आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी या पक्षाचे प्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे १३ वर्षीय पुत्र जीत आठवले यांची बुधवारी निवड जाहीर करण्यात आली. चेंबूर नाका येथे एका कार्यक्रमात जीत यांचा पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जीत आठवले यांच्या हस्ते रिपाइंच्या बाल आघाडी चेंबूर तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या निवडीसुद्धा करण्यात आल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, अभयाताई सोनवणे, शकुंतलाताई आठवले तसेच रवी गायकवाड, संजय डोळसे, हेमंत रणपिसे, सुनील शिरसाट, प्रभावती रणदिवे, अशोक घोक्षे आदी उपस्थित होते. तर रिपाइंच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले या पूर्वीपासूनच काम पाहात आहेत, आता त्यांचा अठरावर्षे वयाच्या आतील मुलगाही देखील रिपाइंच्या माध्यमातून राजकारणात आलेला आहे.