एकजुटीने पक्ष संघटना मजबूत करा-ना.दिवाकर रावते

0
14

भंडारा दि.१०-: शिवसैनिक हा पक्षाचा श्वास आहे. परंतु निवडणूक जिंकण्याची जवाबदारी आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुका विचारात घेऊन बुथनिहाय पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.येथील अशोका हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख खासदार कृपाल तुमाने, जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, सहसंपर्क प्रमुख दीपक शेंद्रे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, शेखर कोतपल्लीवाल, उप जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुधाकर कारेमोरे, विजय काटेखाये, राजेश बुराडे, डॉ अनिल धकाते आदी उपस्थित होते.
शिवसेना संघटन मजबूत करण्यावर भर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनेत मोठे फेरबदल करीत विदर्भाची जवाबदारी म्हणून परिवहन मंत्री यांच्याकडे सोपविली आहे. शिवसेनेच्या सर्वस्तरावरील पदाधिकाºयांची बैठक घेऊन पक्ष संघटना कशा पद्धतीने बांधता येईल, यावर मार्गदर्शन केले. शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी विविध पक्ष हे प्रयत्नशील आहे. परंतु, कट्टर शिवसैनिकांच्या भरवश्यावर शिवसेना उत्तरोतर प्रगतीपथावर आहे. अनेक पक्षांना उतरती कळा असतांना शिवसेना मजबूत स्थितीत आज कायम असल्याचे मत ना. दिवाकर रावते यांनी मांडले.
यावेळी विजय काटेखाये, राजेश बुराडे, डॉ. अनिल धकाते, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमित मेश्राम, तालुका प्रमुख अनिल गायधने, नरेश उचिबघले, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, भरत वंजारी, पवन चौव्हान, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, प्रमोद गायधनी, दिलीप सिंगाडे, युवासेनाचे मुकेश थोटे, मनोज चौबे, मयूर लांजेवार, मोईन रहमान शेख, कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे, मनोहर जागळे, अ‍ॅड. रवी वाडई, प्रमोद मेश्राम, राजू निखाडे, बाळकृष्ण फुलबांधे, प्रकाश पारधी, राजेश चंदेल, कृपाशंकर डहरवाल, अश्विन जगणे, विवेक भोंडेकर, नरेश टेंभरे, मोरेश्वर लांजेवार, सुखदास बडवाईक, जयंत बोटकुले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.