काँग्रेसने केले अमित शहांच्या पुतळ्याचे दहन

0
13

नागपूर,दि.10 – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी चिटणीस पार्क चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. अमित शहाचा मुलगा जय शहा यांची कंपनी तोट्यात होती. नोटाबंदीच्या काळात एकाच वर्षात या कंपनीने सोळा हजारपट नफा कमविला आहे.भ्रष्टाचाराशिवाय हे शक्‍यच नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वतःच्या मुलासाठी केलेला भ्रष्टाचाराचा निषेध म्हणून अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी रामदेवबाबा  यांच्या संपत्तीतदेखील भाजपच्या कार्यकाळात भरमसाट वाढ झाली असल्याचे सांगितले.  सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून सर्व सामान्यांना लुटायचे आणि उद्योगपतींची घरे भरायची असे भाजपचे धोरण आहे.याविरोधात प्रत्येक वस्त्यांमध्ये एकाच दिवशी आंदोलने  केली जातील. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी दहा ते बारा हजार मते घेतली. त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचा भ्रष्टाचार नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावा असे निर्देशही विकास ठाकरे यांनी दिले.