खैरबोडी ग्रामपंचायतीवर वाय.टी.कटरे पॅनलचा कब्जा

0
9

तिरोडा, दि.24 : तालुक्यातील खैरबोडी ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झााली. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे यांच्या नेतृत्वात पॅनलने निवडणूक लढविली. खैरबोड येथील नागरिकांनी कटरे पॅनलवर विश्वास दर्शवित पूर्ण बहुमत दिले आहे. सरपंच पदावर गौतम अनुप मेश्राम ह्या विजयी झाल्या. तर १० सदस्यीय ग्रामपंचायतीत दहाही सदस्य कटरे पॅनलचे विजयी झाले आहेत.एकंदरित या निवडणुकीत कटरे पॅनलने विरोधी पॅनलला भुईसपाट केले आहे.
तालुक्यातील खैरबोडी येथील ग्रा.पं.ची निवडणूक अत्यंत अटी-तटीची झाली. या ग्रा.पं.मध्ये योगेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात पॅनलने निवडणूक लढविल्यामुळे निवडणुकीला फार महत्व आले होते. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कटरे पॅनलने भरभरुन यश संपादन करीत विरोधी पॅनलाल खाते उघडण्यापासूनही दूर ठेवले. सरपंच पदासाठी गौतमा अनुप मेश्राम या विजयी झाल्या. तर सदस्यपदासाठी संदीप खंडाते, सीमा योगेंद्र कटरे, सत्यकला कोवडे, संतोष पारधी, छबीता टेंभरे, गेंदलाल पारधी, अचलकुमार चंद्रीकापुरे, अरुणा सोयाम व डिलेश्वरीश टेंभरे हे विजयी झाले आहेत.