१५ नोव्हेंबरला खा.शरद पवार गडचिरोली दौर्‍यावर

0
11

गडचिरोली,दि.06ः- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षनिरीक्षक राजेंद्र वैद्य होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर उपस्थित होते.यावेळी पक्षनिरीक्षक वैद्य यांनी सर्व उपस्थित तालुकाध्यक्ष व विभागाच्या जिल्हाध्यक्षांचा आढावा घेतला. आढाव्यानंतर त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार गडचिरोली जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने होणारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले.
केंद्र व राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे त्यांच्या आता आपले नेते शरद पवार यांच्याकडे मागर्गदर्शनाकरिता चकरा सुरू आहेत. मात्र शरद पवार हे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळविण्याकरीता गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत प्रवास करणार आहेत. त्याकरीता गडचिरोली येथे होणार्‍या जाहीर सभेचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन वैद्य यांनी यावेळी केले.
बैठकीला जि.प. सदस्य जगन्नाथ पा. बोरकुटे, सोनाली पुण्यपवार, प्रभाकर बारापात्रे, जगन जांभुळकर, फहीमभाई काझी, विनायक झरकर, विवेक बाबनवाडे, मुश्ताक शेख, राजू डांगेवार, डॉ. देविदास मडावी, सुलोचना मडावी, तुकाराम पुरणवार, एम. ए. कालवा, प्रमोद देविकार, सोपानदेव म्हशाखेत्री, प्रभाकर जुमनाके, कृष्णाजी कोटनाके, अ. लतीफ शेख, अजय गोरे, संदिप ठाकूर, अमिन लालानी, भांडेकर, रमेश कोरचा, बरकत सय्यद, दादा चुधरी, मोरेश्‍वर भांडेकर, लिलाधर भरडकर, विक्की मडावी, पुष्पदास लाडे, योगेश निमगडे, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, कबीर शेख, रज्जाकभाई, साजन कुमरे, विजय धकाते व राकॉंचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.