कुठे आहे काळा पैसा – राहुल गांधी

0
5

तुम्हाला पैसे मिळाले का ? तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा करणे दूर राहिले मोदी स्वत: हा दहा लाखांचा सूट परिधान करत आहेत अशी घणाघाती टिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करण्याचा शब्द दिला होता. तुम्हाला पैसे मिळाले का ? तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा करणे दूर राहिले मोदी स्वत: हा दहा लाखांचा सूट परिधान करत आहेत अशी घणाघाती टिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते गुरुवारी बोलत होते. राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये आम आदमी पक्षाचाही समाचार घेतला.
काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आम आदमी पक्ष बलात्कार, भ्रष्टाचार असे मुद्दे उपस्थित करुन आंदोलने करायचा. पण आता दिल्लीमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये ३० टक्के वाढ झालेली असताना हा पक्ष शांत आहे.
आपल्या भाषणात राहुल गांधींनी गरीबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत काँग्रेसचे सरकार आले तर, सर्वप्रथम कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी रोजगार दिला जाईल असे राहुल म्हणाले.