पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन

0
8

नवी दिल्ली,दि.30 : पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झाले. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांची प्राणज्योत मालवली. ते 61 वर्षांचे होते.कालपासून चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांना आर एम एलमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चिंतामण वनगा तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर 2014 मध्ये पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पराभूत करुन खासदार झाले.व्यवसायाने वकील असलेले चिंतामण वनगा यांनी 1990 ते 1996 या काळात भाजपचे ठाणे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तसेच ते महाराष्ट्रातील भाजप आदिवासी सेलचे प्रमुखही होते.चिंतामण वनगा यांच्या रुपाने भाजपने पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं नेतृत्त्व गमावले आहे.