26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home राजकीय राफेलसह महागाईविरोधात एसडीओ कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा

राफेलसह महागाईविरोधात एसडीओ कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा

0
35

गोंदिया,दि.२८ : भाजपाच्या केंद्र सरकारद्वारा राफेल लडाकू विमान खरेदीमध्ये केलेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याचा विरोध, शेतकèयांना पीकविमा व साहाय्यता राशी तसेच कर्जमाफी पात्र शेतकèयांना तत्काळ कर्जमाफी देऊन नो ड्यू प्रमाणपत्र देण्यात यावे, पेटड्ढोल व डिझेल, रसोई गॅसचे वाढते दर व महागाईच्या विरोधात आज(दि.२८) स्थानिक प्रताप लॉन मनोहर चौकातून जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.या मोच्र्याचे नेतृत्व आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे व महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांनी केले.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून मोठ्यासंख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या मोच्र्यात सहभागी झाले होते.
हा मोर्चा स्थानिक मनोहर चौकातून प्रारंभ होऊन जयस्तंभ चौक, चांदनी चौक, गोरलाल चौक, नेहरू चौक मार्गे शहराच्या मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालयावर धडकला.या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
मोच्र्यात माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे,माजी आमदार रामरतनबापू राऊत,डॉ.झामqसह बघेले,पी.जी.कटरे,नामदेवराव किरसान,नगर परिषद सभापती शकील मंसुरी,राधेलाल पटले,पन्नालाल सहारे,प्रदेश एनएसयुआय उपाध्यक्ष संदिप रहांगडाले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन,उषा मेंढे,अशोक लंजे,रत्नदिप दहिवले,डेमेंद्र रहागंडाले,अमर वराडे,जितेंद्र कटरे,राकेश ठाकूर,सुनील तिवारी,देवा रुसे,भागवत मेश्राम,अपुर्व अग्रवाल,विशाल शेंडे,संदिप ठाकुर ,इसुलाल भालेकर,सहेसराम कोरेटी,राजेश नंदागवळी,विशाल अग्रवाल,चिकू अग्रवाल,विक्की बघेले,अर्जुन नागपूरे,निशांत राऊत,सुशिल रहागंडाले, आदीसंह जिल्हतील काँग्रेस कार्यकर्ता,युवक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.