बुधवारी मिळणार मुख्यमंत्री

0
12

नागपूर-भाजपच्या नेतृत्वातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या बुधवारी होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून त्याच दिवशी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल. त्यानंतर लगेच २९ तारखेला नव्या मुख्यमंत्र्ङ्र्माचा जाहीर राज्याभिषेक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वानखेडे स्टेडियम बूक करण्ङ्मात आले आहे. या सोहळ्यासाठी इच्छुकांसह नेते व समर्थक सज्ज झाले आहे.
मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेला पायंड्याची महाराष्ट्रातही अंमलबजावणी होणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ नॅनो असेल, असे संकेत पक्षाने दिले आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित असल्याने समर्थकांची वर्णी लावण्यात आपसूक अडचणी येतात. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने शिवसेनेला सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला किती जागा द्यायचा याचा निर्णय पक्ष नेता निवडीनंतरच ठरणार आहे. शिवसेनेच्या संख्याबळानुसार ९ ते ११ जागा द्याव्या लागतील. शिवसेनेने आपल्या मर्यादेत राहून अटी लावल्यास चर्चा होऊ शकते, अन्यथा त्यांच्या भूमिकेचा फेरविचार होऊ शकतो, अशी स्थिती आहे.
विदर्भात ६२ मतदारसंघांतून भाजपचे ४४ आमदार निवडून आले आहेत. आघाडी सरकारने विदर्भाला सात मंत्री दिले होते, त्यामुळे भाजपने किमान दहा मंत्री द्यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विदर्भातून सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश भारसाकळे, सुनील देशमुख, राजकुमार बडोले, यांची नावे चर्चेत आहेत. यात आणखी कुणाची लॉटरी लागते की कुणाची विकेट जाते हे वेळेवरच कळणार आहे.